कर्जत जामखेड तसा पाहीला तर ऐक विकासापासून वंचित राहीलेला ऐक मागास दुष्काळी मतदारसंघ
मागिल पंचवीस वर्षांपासून ईथे अनेक आमदार होऊन गेले पण कुणालाही या मतदारसंघांचा शाश्वत विकास करता आला नाही*
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने रोहीत दादा पवार यांना प्रचंड मतांनी निवडून दिले.
आमदार रोहीत दादा पवार यांनी विकास काय असतो तो कसा केला जाऊ शकतो याचे रोल मॉडेल कर्जत जामखेड च्या जनतेला दाखवून दिले.
कोरोना चा काळ सोडता रोहीत दादा पवार यांना साधारणतः दोन वर्षं च कार्य करण्यासाठी कालावधी मिळाला. पण तरीही त्यांनी होईल तेवढे जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रभावी अंमलबजावणी प्रयत्न केला.
आमदार रोहीत दादा पवार हे ऐक असे व्यक्तिमत्व आहे की ते मतदारसंघांत विकासाच्या गोष्टी करताना कामे करताना कधीच विरोधी गटातील लोकप्रतिनिधी त्यांचे कार्यकर्ते पाहून भेदभाव करत नाही. अगदी विरोधकांची पण निष्पाप मनाने ते मदत करतात.
सध्या रोहीत दादा पवार यांना विरोधक भूमिपुत्र नाहीत म्हणून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
रोहीत दादा पवार यांनी मतदारसंघात आमदार झाल्यापासून अनेक कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली.
कर्जत जामखेड मतदारसंघांत ज्या वेळी लोकांना उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी वनवन करावी लागत होती तेव्हा रोहीत दादा यांनी त्यांच्या मार्फत संपूर्ण कर्जत जामखेड मतदारसंघात वाड्या वस्त्या गावागावात तीनशे ते चारशे टेंकर मार्फत लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय केली. तेव्हा विरोधकांनी भूमिपुत्र चा मुद्दा नाही उपस्थित केला.
MIDC चा मुद्दा पण सर्वात प्रथम रोहीत दादा पवार यांनी उपस्थित केला. कारण यूवकांना रोजगार उपलब्ध करून दिला तर मतदारसंघ खराखूरा सुजलाम सुफलाम होईल हे सर्वात आधी रोहीत दादा पवार यांनी ओळखले होते. यातही विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत.
निवडणूक २०१९ च्या आधी कर्जत जामखेड मतदारसंघातील रस्ते महामार्ग याची बिकट अवस्था होती. आतापर्यंत किती तरी नागरिकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. यावर रोहीत दादा पवार यांनी वेळोवेळी प्रयत्न करून रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात मंजुर करून आणली.
अहमदनगर सोलापूर महामार्ग कित्येक वर्षांपासून रखडलेल्या स्थिती मध्ये होता अपघातांची मालिका चालू होती अनेक लोक अपघाताने मरण पावले होते. अशा स्थितीत मा श्री आमदार रोहीतदादा पवार यांनी वेळोवेळी केंद्राकडे पाठपुरावा करून तो महामार्ग मंजूर करून घेतला.
अहमदनगर सोलापूर महामार्ग वरील टोलनाक्यावरती स्थानिक जनतेला सुट देण्यासंबंधी पण रोहीत दादा पवार यांचे प्रयत्न चालू आहेत.
रोहीत दादा पवार यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मिरजगाव जिल्हा परिषद गटातील गावांसाठी कोट्यावधी रूपयांची पाणी योजना मंजूर करून आणली. व उर्वरित गावांना पण कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी रोहीत दादा प्रयत्न करत आहेत.
कोरोणाची परीस्थिती असताना जगामध्ये हाहाकार उडाला असताना लोक साधे घराबाहेर पडायला घाबरत असताना रोहीत दादा पवार जीवाची पर्वा न करता सामान्य जनतेची गावोगावी जाऊन विचारपूस करत होते. त्यावेळी आपले भूमिपुत्र राजमहालातील हरळीला पाणी देत होते.
रोहीत दादा पवार हे असे व्यक्तिमत्व आहे लहान मुले सामान्य जनतेमध्ये जाणारे व्यक्तिमत्त्व आहे.
रोहीत दादा यांनी मोठ्या लोकांपासून ते लहान अगदी जन्माला आलेल्या मुलाला पण योग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले.
रोहीत दादा पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघाला आपलं माणूस जबाबदारी समजून भरीव योगदान दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना मतदार संघात चार ते पाच हजार सायकल वाटप केले. आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यासाठी नक्कीच झाला. तसेच शालेय उपयोगी साहीत्य पेन पेन्सिल वह्या कंपास बॉक्स यांचे गरजू विद्यार्थ्यांना कुठलाही भेदभाव न करता केले. यातून रोहीत दादा यांनी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले.
रोहीत दादा पवार यांच्या विषयी बोलण्यासारखे बरेच काही आहे पण तुर्तास एवढेच..
मतदारसंघातील जनतेला नम्र आवाहन आहे की रोहीत दादा पवार यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे.
-- गणेश गांगर्डे
कट्टर रोहीत दादा पवार समर्थक