कर्जत (प्रतिनिधी) : मतदारांचा संभ्रम निर्माण करुन निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याच्या हेतुने वाहनावरील प्लेक्सवर चुकीच्या पद्धतीने माहीती मुद्रीत केल्याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर भोरे यांनी राम नारायण शिंदे व व्यंकटेश्वरा ग्राफिक्सचे मालक यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर भोरे व प्लाईंग स्कॉड क्र 04 मधील अधिकारी व कर्मचारी हे निवडणुक निर्णय अधिकारी कर्जत जामखेड यांच्या आदेशानुसार शासकीय वाहणाने कर्जत शहरात पेट्रोलिंग करत असताना C vigil वर प्राप्त झालेल्या तक्रारीत कॉलरने टाकलेल्या लोकेशनच्या ठिकाणी पाहणी करत असताना कर्जत शहरातील आक्काबाई चौकाच्या पुढे करमाळा रस्त्यावर 100 मिटर अंतरावर व्यंकटेश्वरा ग्राफिक्स या फ्लेक्स प्रिन्टींगच्या दुकानासमोर 07 वाहणांवर उमेदवार राम नारायण शिंदे यांनी मतदारांचा संभ्रम निर्माण करुन निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याच्या हेतुने वाहनावरील प्लेक्सवर चुकीच्या पद्धतीने माहीती मुद्रीत करून प्रकाशीत केल्याबद्दल पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर भोरे यांनी अपक्ष उमेद्वार राम नारायन शिंदे व मुद्रक व्यंकटेश्वरा ग्राफीकचे मालकाविरुद्ध भा न्या संहीता कलम 171. 174 सह लोकप्रतीनिधी अधीनियम चे कलम 123 4 127 अ (1) प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मीनाक्षी कांबळे हे करत आहेत.