कर्जत (प्रतिनिधी)  : कर्जत तालुक्यातील कोंभळी  येथील नूतन श्री दत्त मंदिरात शनिवार, १४ डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री दत्त जन्मोत्सव आयोजनाचे हे ३५ वे वर्ष होते, दरवर्षी प्रमाणे यंदाही जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला.

श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि. ८ ते १४ डिसेंबरदरम्यान  गुरुचरित्र पारायण आयोजित केले होते,  दि. १८ रोजी दत्त जयंतीनिमित्त सकाळी ६ ते ८  या वेळेत श्री दत्तात्रयांना स्नान व अभिषेक करण्यात आला तसेच सकाळी ९ ते ११ वा दत्तगुरूंच्या पादुकांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. ११ ते १२ हभप कुंडलिकराव दरेकर महाराज व हभप भाऊसाहेब अनाड महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते,  दुपारी १२. १५ वाजता दत्तजन्मोत्सव साजरा करण्यात आला, १२ नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांचे वैभव भंडारी यांनी आभार मानले. दरम्यान कोंभळी गावातील आजी माजी सरपंच,उपसरपंच,चेअरमन, मित्र परिवार, ग्रामस्थ, भजनी मंडळी, नातेवाईक, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.