कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी बांधवां करिता कर्जत येथील श्री राजेंन्द्र तात्या फाळके यांच्या सदगुरु ग्राम विकास प्रतिष्ठान च्या वतीने राज्यस्तरीय कृषीप्रदर्शनाचे आयोजन दि ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान कर्जत शहरात फाळके पेट्रोल पंपाशेजारील मैदानात आयोजन केले आहे ,

तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी बांधवां सह नव उद्योजक, व्यावसायिक , महिला यांना या कृषीप्रदर्शनाचा फायदा होणार आहे

या कृषीप्रदर्शना मध्ये नवनवीन तंत्रज्ञान,अवजारे, ट्रॅक्टर्स, ठिबकसिंचन, सोलर, खते , बि-बीयाणे, पशुआहार, सह शेती विषयक सर्व काही एकाच ठिकाणी पाहता येणार असुन , महिला करिता घरगुती लघु उद्योगाची माहीतीही उपलब्ध होणार आहे ,

या कृषीप्रदर्शना चे खास आकर्षण

एक कोटी किमंतीची भारतातील प्रसिध्द अनेक पुरस्कार प्राप्त कर्नाटक येथील रेडा जोडी असणार आहे 

तसेच महिलांसाठी गृहपयोगी वस्तुंचे अनेक  स्टाॅल या ठिकाणी असणार आहे लहानमुलां करिता किड्स झोन ही असणार आहे 

तसेच खवय्यां साठी खास कोल्हापूरचा पांढरा तांबडा रस्सा , निरनिराळ्या पदर्थांची चव घ्यायला मिळणार आहे,

या कृषीप्रदर्शना ला कृषी उत्पन्न बाजार समिति चे सभापती श्री काका साहेब तापकीर व सर्व संचालक मंडळाचे अनमोल सहकार्य लाभले आहे 

असे हे सर्व समावेशक कृषीप्रदर्शनाचा  लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधव ,महिला वर्ग,नव उद्योजकांनी घ्यावा असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समिति चे सभापती श्री काका साहेब तापकीर यांच्या वतीने करण्यात येत आहे

स्टाॅल बुकिंग करिता बंडू पाचपुते ९३२२९३८४४७ व गणेश जठार ७५५८३९४०४३ या नंबर वर संपर्क करावा