मिरजगांव (प्रतिनिधी) : येथील जहागीरदार वाडा, पोस्ट गल्लीतील श्री स्वामी समर्थ मंदिरात काल स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. या निमित्ताने मंदिरास आकर्षक सजावट करण्यात आली होती.
सकाळी स्वामी समर्थांची महाआरती मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. त्यानंतर स्वामींच्या विशेष पारायणाचा कार्यक्रम पार पडला. महाआरतीनंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
संध्याकाळी ५ वाजता गावातून स्वामी समर्थांची भव्य रथयात्रा काढण्यात आली. रथयात्रेदरम्यान संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते. ग्रामस्थ, भाविक आणि सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी स्वामी समर्थ महिला सेवेकरी, पोस्ट गल्लीतील युवक आणि मिरजगांवमधील सर्व स्वामीभक्तांनी विशेष परिश्रम घेतले.